Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर दगडफेक

विशाल पाटलांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर दगडफेक



जत : खरा पंचनामा

सांगली लोकसभेत प्रचारासाठी जात असताना एका माजी आमदाराच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ दौऱ्या दरम्यान जिरग्याळ-मीरवाड रस्त्यावर हा प्रकार घडला. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर दोन ते तीन जणांनी दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे.

याप्रकरणी विलासराव जगताप यांनी जत पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ नये, यासाठी हल्ला करून दबाव आणण्याचा प्रयत्न विरोधक करीत असल्याचा आरोप जगताप करीत आहेत.

भाजपाचे खासदार व उमेदवार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांना हा हल्ला केल्या असल्याचा आरोप विलासराव जगताप यांनी केला आहे. भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करीत काही दिवसापूर्वी जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ मी फुलवले. पक्षाची ताकद वाढविली. याची दखल न घेता वरिष्ठ पातळीवर पक्ष आमच्या विरोधात गट निर्माण करत आहे. अशी तीव्र भावना व्यक्त करत विलासराव जगतापांनी भाजपचा राजीनामा देत उमेदवार विशाल पाटलांना साथ दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.