इनामधामणी येथील तीन पानी जुगार अड्डयावर छापा
सहा जणांना अटक, 2.57 लाखांचा मुद्देमाल जप्त : एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
इनामधामणी (ता. मिरज) येथील बत्तीस माग कारखान्याजवळ चालणाऱ्या तीनपानी जुगार अड्यावर एलसीबीच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोकड, वाहने, जुगार साहित्य असा २ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
दिग्विजय सुभाष श्रीरंबेकर (रा. मौजेडिग्रज), महेश जिन्नू बिरणे, अक्षय राजेंद्र भोसले, अच्युत गोपाळ नाईक, सुहास कृष्णा कोळी व सतीश महावीर पाटील (सर्व रा. इनामधामणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सहा मोबाईल, ३ मोटारसायकली, रिक्षासह इतर साहित्य असा २ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाईसाठी एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकातील पोलिस मिरज विभागात गस्तीवर होते. त्यावेळी इनामधामणी येथे बंद पडलेल्या माग कारखान्याजवळ असणाऱ्या सम्मेद पाटील यांच्या जुन्या घराच्या वरच्या मजल्यावर बेकायदेशिरपणे तीन पानी जुगार खेळला जात आहे अशी माहिती पथकाला मिळाली. पथकाने इनामधामणी येथे छापा टाकला. त्यावेळी संशयित सापडले. संशयितांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेण्यात आले. याबाबत सांगली ग्रामिण पोलिस नोंद झाली आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरिक्षक कुमार पाटील, अरूण औताडे, अतुल माने, श्रीधर बागडी, सुशिल मस्के, सुमित सूर्यवंशी, ऋतुराज होळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.