Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चुलत्याचा खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या पुतण्याला अटक आई-वडिलांना शिवीगाळ करत असल्याने डोक्यात घातली बरणी : कवठेएकंदमधील घटनेचा सांगली एलसीबीकडून छडा

चुलत्याचा खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या पुतण्याला अटक 
आई-वडिलांना शिवीगाळ करत असल्याने डोक्यात घातली बरणी : कवठेएकंदमधील घटनेचा सांगली एलसीबीकडून छडा 

सांगली : खरा पंचनामा 

आई-वडीलांना सतत शिवीगाळ करणाऱ्या चुलत्याचा डोक्यात बरणी घालून खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.

सुभाण उस्मानगणी तांबोळी (वय २३, रा. कवठेएकंद, ता तासगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर मिरासो बाबासो तांबोळी (वय ६२) असे मृताचे नाव आहे. दि. 24 एप्रिल रोजी मीरासो तांबोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांचा पुतण्या सुभान याने पायऱ्यांवरून घसरून पडल्याने ते जखमी झाल्याचे तासगाव पोलिसांना सांगितले होते.

त्यानंतर उपचार सुरु असताना मीरासो यांचा मृत्यू झाला. याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र हा खून असल्याचा संशय आल्याने निरीक्षक शिंदे यांनी अधिक तपासासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते. त्यावेळी पथकाला सुभान यानेच खून करून अपघाताचा बनाव रचल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. त्याला अटक करून तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सागर लवटे, नागेश खरात, अनिल कोळेकर, सतिश माने, संदिप गुरव, अमर नरळे, मछिंद्र बर्डे, महादेव नागणे, उदय माळी, संदिप नलावडे, विक्रम खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.