Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्लाह हू अकबर.. जय श्री राम ! माझ्या बॅगेत बॉम्ब आहेविमान प्रवाशांमध्ये उडाला एकच गोंधळ

अल्लाह हू अकबर.. जय श्री राम ! माझ्या बॅगेत बॉम्ब आहे
विमान प्रवाशांमध्ये उडाला एकच गोंधळ

वाराणसी : खरा पंचनामा

उत्तर प्रदेशातील वाराणसीहून बेंगलुरूला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला. मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत फ्लाइट थांबवण्यात आली.

या काळात फ्लाइट आणि धावपट्टीची तपासणी करण्यात आली. कॅनेडियन नागरिक योहानाथन निशिकांत याने बॉम्ब असल्याची माहिती दिली होती, तो स्वतः त्या फ्लाइटमध्ये होता. तीन तासांच्या तपासणीनंतर ही माहिती अफवा असल्याचे सिद्ध झाले आणि फ्लाइट बेंगलुरूसाठी रवाना करण्यात आली. योहानाथन निशिकांत याला विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी फूलपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

कॅनेडियन नागरिक योहानाथन निशिकांत याला फूलपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक करून चौकशी सुरू केली आहे. शनिवारी मध्यरात्री इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक 6E-499 ही नियोजित वेळेपेक्षा थोडी उशिरा, रात्री 10:24 वाजता उड्डाण करणार होती. याचवेळी कॅनेडियन नागरिक योहानाथन आपली सीट सोडून पुढे जाऊन बसला होता. जेव्हा क्रू मेंबर्सनी त्याला परत आपल्या सीटवर जाण्यास सांगितले, तेव्हा तो संतापला आणि ओरडत म्हणाला की माझ्या बॅगेत बॉम्ब आहे.

एवढेच नाही, धमकी दिल्यानंतर हा प्रवासी जोरजोरात 'अल्लाह हू अकबर', 'जय श्री राम' आणि 'हर हर महादेव' अशा घोषणा देऊ लागला. प्रवाशाच्या या कृतीमुळे विमानात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तातडीने पायलटने फ्लाइट धावपट्टीवरून परत वळवण्याचा निर्णय घेतला आणि याबाबतची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली. विमान परत एप्रनवर माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली. विमान परत एप्रनवर आणले गेले आणि फ्लाइट रिकामी करण्यात आली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेने संपूर्ण फ्लाइटसह विमानतळाची सखोल तपासणी केली.

सुमारे तीन तास चाललेल्या तपास मोहिमेनंतर फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची बाब अफवा असल्याचे सिद्ध झाले. ही माहिती अफवा ठरल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळाला. पहाटेची फ्लाइट बेंगलुरूसाठी रवाना झाली. विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कॅनेडियन नागरिक योहानाथन निशिकांत याची तासन्तास चौकशी केल्यानंतर त्याला फूलपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी योहानाथनविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. त्याने असे का आणि कोणाच्या सांगण्यावरून केले याचा तपास केला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.