Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बडतर्फ रणजीत कासलेच्या अडचणीत आणखीन वाढ; अंबाजोगाई चौथा गुन्हा दाखल

बडतर्फ रणजीत कासलेच्या अडचणीत आणखीन वाढ; अंबाजोगाई चौथा गुन्हा दाखल

बीड : खरा पंचनामा

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसह माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर थेट आरोप करणाऱ्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

रणजीत कासलेविरोधात आणखी एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या शैक्षणिक शुल्कासाठी पैशांची गरज आहे म्हणून सुदर्शन काळे यांच्याकडून दहा लाख रुपये उसने घेत त्यातील अडीच लाख रुपये परत न केल्याच्या आरोप कासलेंवर करण्यात आले आहेत. या प्रकरणात रणजीत कासले याच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, परळी विधानसभा निवडणूक काळात स्ट्रॉग रूमपासून दूर राहण्यासाठी मला धनंजय मुंडे यांच्या माणसाने दहा लाख रुपये दिल्याचा दावा कासले यांनी केला होता. परंतु आता त्याचा हा दावा खोटा असल्याचे समोर आले असून त्याने पैसे परत न केल्याने काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रंजीत कासले हा साध्या छत्रपती संभाजीनगर येथील हर्मूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

दुसरीकडे, बीड कारागृहात असलेल्या रणजीत कासले याला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सल कारागृहात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रणजीत कासलेला बीड कारागृहातून हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.