Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्मवीर पतसंस्थेच्या सेवकांना आरोग्य, अपघाती विम्याचे संरक्षण कामगार दिनाची भेट : चेअरमन रावसाहेब पाटील

कर्मवीर पतसंस्थेच्या सेवकांना आरोग्य, अपघाती विम्याचे संरक्षण 
कामगार दिनाची भेट : चेअरमन रावसाहेब पाटील

सांगली : खरा पंचनामा

येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगली च्या सर्व सेवक आणि त्यांच्या कुटूंबीयांचा कर्मवीर पतसंस्थेच्यावतीने पाच लाखापर्यंतचा मेडीक्लेम विमा उतरवून आरोग्य संरक्षण देण्यात आले. त्यामुळे संस्थेचे सर्व सेवक आणि त्यांचे कुटुंबीय यांना आता पाच लाखापर्यंतचे सर्व वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत.

याशिवाय आणखी सर्व सेवकांना रु. १५ लाखाचे अपघाती विमा संरक्षणचा भारतीय पोस्ट ऑफीसचा विमा देखील संस्थेने उतरविला. त्यामुळे सेवकांना १५ लाखाचे अपघाती संरक्षण देखील मिळणार आहे. यामध्ये १ लाखापर्यत अपघाती हॉस्पीटल खर्च देखील समाविष्ठ आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली.

तसेच कामगार दिनाच्या निमित्ताने आयोजित आरोग्य शिबीरामध्ये सेवकांच्या ६० प्रकारच्या वैद्यकीय टेस्ट देखील करण्यात आल्या. त्यामध्ये सेवकांच्या तब्बेतीबाबत त्यांना तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. यातून आरोग्यपुर्ण आयुष्य जगण्यासाठी सेवकां ना घ्यावी लागणारी खबरदारी व मार्गदर्शन मिळाले आहे. संस्थेच्या प्रगतीमध्ये सेवकां चे योगदान महत्वाचे असून त्यांचे आरोग्य सद्दढ असणे महत्वाचे आहे. याचा विचार करुन ही तिहेरी मोठी भेट कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संस्थेचे सर्व सेवक व त्यांच्या कुटूंबियांना संस्थेच्या संचालक मंडळाने दिल्याची माहिती रावसाहेब पाटील यांनी दिली.

यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक अॅड. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, ओ. के. चौगुले (नाना), वसंतराव धूळाप्पाण्णा नवले, डॉ. एस. बी. पाटील (मोटके), डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका भारती आप्पासाहेब चोपडे, चंदन नरेंद्र केटकाळे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, लालासो भाऊसाो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांच्या सह संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.