Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांचा निकाल जाहीरकोण अव्वल, कोणाला सर्वात कमी टक्के?

राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांचा निकाल जाहीर
कोण अव्वल, कोणाला सर्वात कमी टक्के?

मुंबई : खरा पंचनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमांचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये जलसंपदा, गृह, ग्राम विकास, पशुसंवर्धन, बंदरे, उच्च आणि तंत्र शिक्षण, कामगार, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य, खनिकर्म, दुग्धव्यवसाय, रोजगार हमी योजना या खात्यांना शंभर टक्के मार्क देण्यात आले आहे.

गेल्या शंभर दिवसात राज्य सरकारमधील मंत्र्यांनी काय कामगिरी केली याचं निकालपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून याची माहिती दिली. एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत.

1 जलसंपदा - 100% - राधाकृष्ण विखे पाटील - गिरीश महाजन
2 गृह- 100% - देवेंद्र फडणवीस
3 ग्राम विकास - 100% - जयकुमार गोरे
4 पशुसंवर्धन - 100% -
5 बंदरे - 100% -
6 उच्च व तंत्र शिक्षण 100% चंद्रकांत पाटील
7 कामगार - 100% -
8 वस्त्रोद्योग - 100% संजय सावकारे
9 सांस्कृतिक कार्य- 100% - आशिष शेलार
10 खनिकर्म - 100% -
11 दुग्धव्यवसाय - 100% - अतुल सावे
12 रोजगार हमी योजना - 100% -
13 ऊर्जा - 98% - देवेंद्र फडणवीस
14 उद्योग - 97% - उदय सामंत
15 महसूल - 96% - राधाकृष्ण विखे पाटील
16 परिवहन - 94% - प्रताप सरनाईक
17 शालेय शिक्षण - 94% - दादाजी भुसे
18 अन्न, औषध प्रशासन 92% नरहरी झिरवाळ
19 मदत व पुनर्वसन - 90% -
20 विमानचालन - 89% -
21 कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता - 89% - मंगलप्रभात लोढा
22 महिला व बाल विकास 88% अदिती तटकरे
23 कृषी- 86% - माणिकराव कोकाटे
24 मत्स्य- 86% - नितेश राणे
25 नगर विकास 1 - 85% - एकनाथ शिंदे
26 वैद्यकीय शिक्षण आणि औषध- 85% हसन मुश्रीफ
27 माहिती तंत्रज्ञान- 83% -
28 सहकार - 83% -
29 राज्य उत्पादन शुल्क- 83% -
30 सार्वजनिक आरोग्य 80% प्रकाश अबिटकर
31 मराठी भाषा- 75% - उदय सामंत
32 सार्वजनिक बांधकाम 73% शिवेंद्रराजे भोसले
33 पाणी पुरवठा व स्वच्छता 69% - गुलाबराव पाटील
34 पर्यटन - 69% - शंभूराज देसाई
35 गृहनिर्माण - 68% -
36 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य 68% संजय शिरसाट
37 मृद व जलसंधारण 67% संजय राठोड
38 क्रीडा व युवक कल्याण 67% दत्तात्रय भरणे
39 आदिवासी विकास 63% अशोक उईके
40 पर्यावरण- 60% - पंकजा मुंडे
41 माहिती व जनसंपर्क- 55% आशिष शेलार
42 वन- 44% - गणेश नाईक
43 इतर मागास बहुजन कल्याण- 44% -
44 पणन- 43% - जयकुमार रावल
45 दिव्यांग कल्याण - 36% -
46 नगर विकास- 34% -
47 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण - 33% - धनंजय मुंडे
48 सामान्य प्रशासन (सेवा) 24% देवेंद्र फडणवीस

सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांचा रिपोर्टकार्ड
जिल्हा जिल्हाधिकारी टक्केवारी
चंद्रपूर विनय गौडा 84.29%
कोल्हापूर अमोल येडगे 81.14%
जळगाव आयुष प्रसाद 80.86%
अकोला अजितकुमार कुंभार 78.86%
नांदेड राहुल कर्डिले 66.86%

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.