Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 370 पोलीस निरीक्षक, 503 सहायक निरीक्षक, 632 उपनिरीक्षकांच्या बदल्या

राज्यातील 370 पोलीस निरीक्षक, 503 सहायक निरीक्षक, 632 उपनिरीक्षकांच्या बदल्या 

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील 370 पोलीस निरीक्षक, 503 सहायक निरीक्षक, 632 उपननिरीक्षकांच्या बदल्या मंगळवारी करण्यात आल्या आहेत. शिवाय राखीव पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) डॉ. सुखविंदर सिंह यांच्या सहीने बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

बदली झालेल्या निरीक्षकांपैकी 249 जणांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने तर 121 जणांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. 503 पैकी 429 सहायक निरीक्षकांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने तर 74 जणांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. 632 पैकी 566 उपनिरीक्षकांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने तर 66 जणांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत.

सांगलीतील निरीक्षक तानाजी सावंत यांची नाशिक शहरकडे साताऱ्याचे राजेंद्र मस्के यांची विनंतीवरून सांगलीला बदली करण्यात आली आहे. साताऱ्यातील राजू ताशिलदार यांना विनंतीवरून एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. विश्वजित मुळे यांची पिंपरी चिंचवड ते पीटीसी तुरची येथे, भाऊसाहेब पाटील यांची सातारा ते पुणे, वनिता कुलकर्णी यांची गुप्तवार्ता ते पीटीसी तुरची, रेश्मा डफळे यांची पिटीसी तुरची ते मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

सांगलीतील निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांची पिटीसी सोलापूर, सचिन पाटील यांची कोल्हापूर ते पुणे ग्रामीण, नीरज उबाळे यांची एसीबी ते सोलापूर ग्रामीण, अरुण देवकर यांची सिंधुदुर्ग ते सातारा विनंतीवरून बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.