Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजाला मानवंदनाविविध क्षेत्रातील मान्यवरांचा केला सन्मान

सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा केला सन्मान

सांगली : खरा पंचनामा

महाराष्ट्र राज्याच्या ६६ वा स्थापना दिवस राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होता आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना  दिनानिमित्त सांगली जिल्ह्यात पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.  

यावेळी मंत्री पाटील यांनी  करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच, सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या व्यक्तींचा सन्मान चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्वांचे करुन अभिनंदन केले. तसेच, पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचाही गौरव यावेळी पाटील यांनी केला. या राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण याठिकाणी  करण्यात आले. 

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.