पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाला अटक
असिम मुनीरला थेट तुर्कस्तानला घेऊन गेले?
इस्लामाबाद : वृत्त संस्था
भारतीय वायुदलाने तर पाकिस्तानात अक्षरशः थैमान घातलं आहे. वायुदलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद भाजून काढली. लाहोर, पेशावरवर वायुदलाने तुफान मारा केला.
पाकिस्तानची तब्बल 16 शहरं वायुदलाच्या टार्गेटवर होती. वायुदलाची विमानं, क्षेपणास्त्र, ड्रोन्स यांनी पाकिस्तानला काल रात्री कत्तल की रातची आठवण केली. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये केलेला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळला. जम्मूच्या सतवारीमध्येही पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. हा हल्ला देखील भारतानं हाणून पाडला. अखनूर, सांबा, होशियारपुर, जालंधर याठिकाणीही पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तिकडे पठानकोट आणि अमृतसरवर केलेला हल्ला देखील भारतानं हाणून पाडला. आता पाकिस्तानमधून एक मोठी घडामोड समोर आली आहे.
पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची उचलबांगडी केल्याची चर्चा आहे. असीम मुनीर याच्या हेकेखोरीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याचं मत तिथल्या नागरिकांचे आणि सत्ताधाऱ्यांचं झाल्याची माहिती आहे. त्याचमुळे असीम मुनीर याच्यावर देशद्रोहाचा खटलाही चालवला जाणार असल्याची माहिती आहे. यानंतर आता असीम मुनीरला तुर्कस्थानला घेऊन गेल्याचं सांगण्यात येत आहे. असिम मुनीरला बळीचा बकरा बनवण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न केला जातोय. असीम मुनीर हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची भावना भारताची आहे. त्याच्या चिथावणीनंतरच दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांना चिथवायचं आणि नंतर भारताने प्रतिक्रिया दिल्यावर भारतावर हल्ला करायचा असा असीम मुनीर याचा डाव होता, असं बोललं जातंय.
पाकिस्तानी जनतेची आणि राज्यकर्त्यांची इच्छा नसतानाही असीम मुनीरच्या खुमखुमीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याची समज सर्वत्र आहे. आधीच पाकिस्तानची परिस्थिती ही डबघाईला आली होती. त्यात भारतासोबत कुरापत काढून असीम मुनीरने ही परिस्थिती आणल्याची भावना तिथल्या लोकांची आहे. सध्य स्थितीमध्ये पाकिस्तानला युद्ध परवडणार नाही. अशाही स्थितीत असीम मुनीरने पाकिस्तानला युद्धाच्या खाईत लोटलं.
जानेवारी 2023 मध्ये राजौरीमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, एप्रिल 2023 मध्ये भारतीय सैन्याच्या ताफ्यावर हल्ला, जून 2024 मध्ये वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या बसवर हल्ला, ऑक्टोबर 2024 मध्ये सोनमर्ग बोगद्यात काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला, या सगळ्या दहशतवादी कारवायांमागे मुनीरचं डोकं होतं. दहशतवाद पसरवण्यासाठी त्यानं पंजाब प्रांतातल्या गँगस्टर्सचीही मदत घेतली होती. असीम मुनीर फक्त पाकिस्तानी सेनाप्रमुखच नाही. तर एक कॉर्पोरेट नेताही आहे. ज्यानं शाहबाज शरीफ यांच्या सरकारला आपल्या हातातलं खेळणं बनवून ठेवलंय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.