बायकोनं फक्त १२०० रूपयांत नवऱ्याचा काटा काढला!
अमरावती : खरा पंचनामा
नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी बायकोने सुपारी देत त्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. अमरावतीच्या खोलापुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली.
नवऱ्याला उद्दल घडवण्याचा कट रचत १२०० रुपयांची सुपारी दिली होती. याप्रकरणी पत्नीसह चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेने मावसभावालाच ही सुपारी दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बायकोसोबत दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला अडवून हॉकी स्टिकने मारहाण करत त्याच्याकडे असलेला ९५ हजारांचा ऐवज लुटण्यात आला होता. ही घटना अमरावतीच्या खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना जी माहिती समोर आली ते पाहून पोलिसही चक्रावले.
या मारहाण आणि लुटमारी प्रकरणाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिस आयुक्तांच्या स्पेशल स्कॉडला यश आले आहे. अवघ्या १२०० रुपयांत बायकोनेच पतीला बेदम मारहाण करून त्याला अद्दल घडविण्याची सुपारी दिल्याचे तपासातून निष्पन्न झाले. मावसभावाच्या मदतीने तिने नवऱ्याला लुटल्याचे तपासातून समोर आले. लग्नाआधी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्यामुळे नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी महिलेने हे कृत्य केले.
या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीच्या बायकोसह तिचा मावसभाऊ याणि त्याचे दोन साथीदार यांना अटक केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.