Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवारांना दोन नोटिसा ! भीमा कोरेगाव आयोगासमोर उद्या हजर राहणार?

शरद पवारांना दोन नोटिसा ! 
भीमा कोरेगाव आयोगासमोर उद्या हजर राहणार?

पुणे : खरा पंचनामा

भीमा कोरेगाव आयोगासमोर उद्या शरद पवार हजर राहण्याची शक्यता आहे. पवारांनी हजर राहावं, असा अर्ज कोरेगाव आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यानुसार आयोगाने दोन वेळेस शरद पवारांना नोटीसा पाठवल्या आहेत. आता उद्या आयोगाची तारीख असून शरद पवार हजर राहतील का? हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे की, शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते, ज्यात भीमा कोरेगाव येथील दंगल ही 'घडवून आणलेली' असल्याचा उल्लेख आहे. आंबेडकर यांनी हे पत्र आयोगाच्या रेकॉर्डवर आणण्याची मागणी केली होती. आयोगाने ही मागणी मान्य करत पवार यांना नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला. आंबेडकर यांच्या मते, हे पत्र आयोगासमोर आल्यास दंगलीमागील सत्य समोर येईल आणि आयोगाला योग्य शिफारशी करणे सोपे होईल.

प्रकाश आंबेडकर यांच्या विनंतीनुसार, आयोगाने शरद पवार यांना त्यांच्याकडील पत्र आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे. आंबेडकर यांचे वकील ऍड. किरण कदम यांनी याबाबत आयोगाला विनंती केली होती, ज्याला आयोगाने मान्यता दिली. जर पवार यांनी हे पत्र सादर केले, तर त्याआधारे आयोग पुढील कारवाईचा निर्णय घेईल, ज्यात पवार यांना साक्षीसाठी बोलवण्याचा समावेश असू शकतो. त्यामुळे उद्या शरद पवार हजर राहतात की नाही? हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.