संशोधनात देशाची परंपरा वैभवशाली, त्यामुळे संशोधनाचा विचार वाढविला पाहिजे
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचेप्रतिपादन
पुणे : खरा पंचनामा
राष्ट्रीय समाज विज्ञान परिषद आणि डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. समाज विज्ञान विषयावर आयोजित या परिषदेच्या समारोप सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन सर्व संशोधकांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आजचे युग हे विज्ञानाचे युग असून आजच्या काळात संशोधनाला अधिकाधिक महत्व आहे. संशोधन क्षेत्रात आपल्या देशाची परंपरा अतिशय वैभवशाली राहिली आहे. संशोधन क्षेत्र अधिक समृद्ध करण्यासाठी विज्ञानावर भर देत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणले आहे. आपली वैभवशाली परंपरा जागृत करण्याचा मोदीजींचा प्रयत्न आहे. त्यामुळे संशोधनाचा हा विचार वाढविला पाहिजे अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी संघाचे ज्येष्ठ प्रचारक जे. नंदकुमार, प्रा. राजकुमार भाटिया, माजी खासदार प्रदीपदादा रावत, डेक्कनचे कुलगुरू प्रा. प्रसाद जोशी, प्रा. पी. व्ही. भट्ट, प्रा. शैला राज, प्रा. एन. डी. वाजपेयी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.