उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने १०० दिवसांत केली उत्तम कामगिरी
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १०० टक्के यशाबद्दल सहकाऱ्यांचे केले अभिनंदन
मुंबई : खरा पंचनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर जनतेला गतिमान सेवा देण्यासाठी प्रत्येक विभागाला १०० दिवसांचा कृती आराखडा देण्यात आला होता. यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने १०० दिवसांत उत्तम कामगिरी केली असून निर्धारित केलेली ११ लक्ष्य पूर्ण केली आहेत. तंत्र शिक्षण विभागाच्या संचालकांची सर्वोत्तम संचालक म्हणून निवडसुद्धा झाली आहे. या १०० टक्के यशाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी विभागातील सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विभागाच्या कामगिरीला कौतुकाची थाप दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती देताना म्हटले, महाराष्ट्रात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवून महत्त्वपूर्ण नवीन धोरणे, दूरगामी निर्णय आणि लोकाभिमुख उपक्रमांची आखणी केली आहे. गेल्या 100 दिवसांत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निश्चित केलेली ११ धोरणात्मक उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.या कामगिरीत विभागाने राज्याच्या शैक्षणिक विकासाला चालना देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी यशस्वीपणे केली आहे.
राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे पूर्णतः साध्य केली आहेत. एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.