Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शैक्षणिक संस्थाचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

शैक्षणिक संस्थाचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

पुणे : खरा पंचनामा

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि असोसिएशन ऑफ सेल्फ फायनान्सच्या वतीने आयोजित शैक्षणिक संस्थाचालक, प्राचार्य आणि संस्था प्रतिनिधींशी संवाद कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सहभाग घेतला. यावेळी पाटील यांनी शैक्षणिक संस्थाचालकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे देखील त्यांनी आश्वस्त केले‌. 

यावेळी पाटील म्हणाले, खासगी संस्थानी सरकारमार्फत निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा स्वतंत्रपणे मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करून कंपन्यांकडून सीएसआर निधी मिळविण्यासाठी प्रयन्त करावेत. राज्यात शिक्षणाचा व्याप वाढत चालला आहे. त्यामुळे समस्या देखील वाढणार आहेत. महाराष्ट्रातील पैसा बाहेर जाऊ नये म्हणून विविध अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. याशिवाय राज्यातील प्रत्येक शासकीय तंत्रनिकेतन संस्थेला तीन कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेत अद्ययावत उपकरणे आणण्यासाठी हा निधी देण्यात आला असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. 

पाटील पुढे म्हणाले राज्यातील उच्च व तंत्र शिक्षणासह कृषी, वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत असणारी असमानता, राज्य सामायिक प्रवेश परीक्षांची वाढती संख्या , तसेच इडब्ल्यूएसच्या आरक्षणाच्या विविध वव्यावसायिक अभ्यासक्रमांमधील अंमलबजावणीतील भिन्नता अशा प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तसेच संस्थचालकांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंगळवारी होणाऱ्या मुंबईतील बैठकीत चर्चा करण्यात येईल. या बैठकीत उच्च शिक्षणातील अनेक प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले. 

यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, असोसिएशन ऑफ सेल्फ फायनान्सचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह शामकांत देशमुख, पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या तथा प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह निवेदिता एकबोटे, ए.एस.एफ.आय.चे धनंजय अडसूळ, राजीव जगताप, प्रकाश पाटील यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक, प्राचार्य आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.