पाचशे रूपयांच्या बनावट नोटा चलनात, दोघांवर गुन्हा दाखल
गेवराई : खरा पंचनामा
दहा हजार रूपयांच्या खऱ्या नोटा देऊन वीस हजार रूपयांच्या पाचशे रूपयांच्या बनावट नोटा स्वतः जवळ बाळगून त्याच नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुध्द बीडमधील गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बालाप्रसाद बाहेती (रा. गेवराई, लाड गल्ली), नासेर शेख (रा. बोधेगाव जि. अहिल्यानगर) अशी आरोपीची नावे आहेत. बालाप्रसाद बाहेती याने चलनातील दहा हजार रुपयांच्या ख-या नोटा देत नासेर शेख याच्याकडून विस हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चलनात वापरत असल्याचा प्रकार काल धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई बायपास रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर उघडकीस आला.
पोलीस हवालदार राजु भिसे यांच्या तक्रारीवरून आरोपी बालाप्रसाद बाहेती व नासेर शेख याच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय दिपक लंके हे करित आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.