Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई विशेष पोलीस आयुक्त पद तात्पुरते रद्द!

मुंबई विशेष पोलीस आयुक्त पद तात्पुरते रद्द!

मुंबई : खरा पंचनामा

२०१५ मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्यासाठी अपग्रेड करण्यात आलेले मुंबई आयुक्त हे पद तब्बल १० वर्षांनी पुन्हा डाऊनग्रेट करून अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) असणारे १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

देवेन भारती यांच्यासाठी मुंबई पोलीस दलात तयार करण्यात आलेले विशेष पोलीस आयुक्त हे पद काही महिन्यासाठी रिक्त ठेवण्यात येणार पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या पोलीस महासंचालक (DG) पदोन्नती नंतर विशेष पोलीस आयुक्त मुंबई हे पद भरले जाणार असल्याची चर्चा मुंबई पोलीस दलात सुरू आहे.

साल २०१५ पूर्वी मुंबई पोलीस आयुक्तपदी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येत होती. २०१५ मध्ये अहमद जावेद हे पोलीस महासंचालक (होमगार्ड) होते. त्यांच्या सेवानिवृत्तीला काही महिने उरलेले असताना त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदी बसविण्यासाठी राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्त हे पद अपग्रेड करून अहमद जावेद यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. तत्कालिन मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद हे सेवानिवृत्त झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त हे पद पुन्हा डाउनग्रेट करून अतिरिक्त पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

पडसलगीकर यांना ६ महिन्यांनी पदोन्नती मिळताच मुंबई पोलीस आयुक्त हे पद पुन्हा एकदा अपग्रेट करण्यात आले होते. पडसलगीकर यांच्या सेवानिवृत्ती नंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावर पोलीस महासंचालक दर्जाचे सुबोध जयस्वाल, संजय बर्वे, परमबीर सिंह, नगराळे आणि संजय पांडे आणि विवेक फणसळकर हे यांची नियुक्ती करण्यात आली होती. फणसळकर हे पोलीस आयुक्त असताना पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक (IG) यांच्यातील पोकळी भरून काढण्यासाठी त्या पदावर अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे पोलीस अधिकारी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी नमूद केले होते की, इतर आयुक्तालयांमध्ये असलेले अतिरिक्त महासंचालक दर्जाचे विशेष आयुक्त हे पद प्रशासकीय पदानुक्रमातील पोकळी भरून काढण्यास मदत करेन. 

तथापि, मुंबई पोलिस आयुक्तपदी अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) दर्जाचे अधिकारी देवेन भारती यांची नियुक्ती झाल्यानंतर, विशेष आयुक्त पदाचे काय होईल असा प्रश्न अनेकांना पडला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सध्या त्यांनी विशेष आयुक्त म्हणून कोणाचेही नाव घेतलेले नाही. तथापि, पदाच्या निर्मितीसाठी दिलेला तर्क सध्या टिकत नाही. ते कनिष्ठ (ADG) दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करतात का किंवा भारती यांना पोलीस महासंचालक (DG) म्हणून बढती मिळेपर्यंत वाट पहावी लागणार. पोलीस आयुक्त देवेन भारती ऑगस्ट २०२५ मध्ये बढतीस पात्र आहे, भारती यांना बढती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त हे पद पुन्हा अपग्रेड करून विशेष पोलीस आयुक्त पदावर अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची नियुक्ती करून रिक्त जागा भरण्यात येईल असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.