तमदलगे येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून
मृत निमशिरगावचा, कारण अस्पष्ट
जयसिंगपूर : खरा पंचनामा
शिरोळ तालुक्यातील तमदलगे येथील येथील डोंगराच्या पायथ्याशी एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत तरुण निमशिरगाव येथील असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगण्यात आले.
अविनाश कामगोंडा पाटील असे मृताचे नाव आहे. मृतदेहा शेजारी एक दुचाकी (एम एच 09 एफ वाय 5362) उभ्या स्थितीत सापडली आहे. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत असून परिसरातील सिसिटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलीस खुनाच्या कारणाचा तसेच मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.