रिलेशनशिपच्या पोस्टने हादरलेल्या लालूंचा सर्वात मोठा निर्णय
मुलाची कुटुंबासह पक्षातूनही हकालपट्टी
पाटणा : खरा पंचनामा
बिहारच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपल्या मुलाची पक्षासह कुटुंबातूनही हकालपट्टी केली आहे. यापुढे त्यांची पक्षात आणि कुटुंबात कोणतीही भूमिका असणार नाही, अशी घोषणा लालूंनी केली आहे. त्यामुळे बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
लालूंनी पुत्र व बिहारचे माजी मंत्री तेजप्रताप यादव यांची सहा वर्षांपासून पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच कुटुंबासोबतचे त्यांचे नातेही तोडले आहे. तेजप्रताप यांनी शनिवारी सोशल मीडियात एक पोस्ट करत आपल्या रिलेशनशिपबाबत माहिती दिली होती. अनुष्का यादव नावाच्या मुलीसोबतचा एक फोटो पोस्ट करत तिच्याशी आपले 12 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे यादव कुटुंबासह, राजद आणि बिहारमध्येही चर्चाना ऊत आला. केल्याचे त्यांनी सांगितले होते. पण त्यानंतरही त्यांचे वडील व राजदचे प्रमुख लालू प्रसाद यांनी रविवारी सर्वात मोठा निर्णय घेतल्याने खडबळ उडाली आहे. त्यांनी सोशल मीडियातच याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे.
लालूंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, खासगी आयुष्यात नैतिक मुल्यांची अवहेलना करणे म्हणजे आपल्या सामाजिक न्यायासाठीच्य सामूहिक संघर्षाला कमजोर करण्यासारखे आहे. ज्येष्ठ मुलाचे बेजबाबदार वागणे आमची कौटुंबिक मुल्ये आणि संस्कारांच्या विपरीत आहे. त्यामुळे त्यांना पक्ष आणि कुटुंबापासून दूर करतो.
आतापासून पक्ष आणि कुटुंबाशी त्यांचा कोणताही संबंध नसेल. त्यांना पक्षातून सहा वर्षांपासून निलंबित केले जात आहे, अशी मोठी घोषणा लालूंनी केली आहे. आपल्या खासगी आयुष्याबाबत चांगले-वाईट आणि गुण-दोष पाहण्यात ते स्वतः सक्षम आहेत. त्यांच्यासोबत जे लोक संबंध ठेवतील, त्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा, अशा इशाराही लालूंनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.