Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुन्ह्यांच्या तपासाबरोबरच आरोपींना अटकाव करण्याची पोलिसांची जबाबदारीपोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे मत

गुन्ह्यांच्या तपासाबरोबरच आरोपींना अटकाव करण्याची पोलिसांची जबाबदारी
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे मत

पुणे : खरा पंचनामा

'समाजाची सुरक्षितता हे पोलिसांचे आद्यकर्तव्य आहे. गुन्ह्यांचा तपास करत असताना आरोपींना अटकाव करण्याची जबाबदारीही पोलिसांची आहे,' असे मत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केले.

पोलीस संशोधन केंद्रात आयोजित केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान सोहळ्यात पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बोलत होत्या. या वेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, रोहिदास पवार आदी उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त अकरा अधिकाऱ्यांना या वेळी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहायक निरीक्षक मनोज पवार, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, उपविभागीय अधिकारी अजित पाटील, सहायक निरीक्षक राणी काळे, पोलीस निरीक्षक दीपशिखा वारे, पोलीस उपअधीक्षक सुरेशकुमार नानासाहेब राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांचा समावेश आहे. 'बदलत्या काळानुसार गुन्ह्यांचे पुरावे संकलित करण्यासाठी पोलिसांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानााचा वापर केला जात आहे. खून, दरोडा, जबरी चोरी, महिलांवरील अत्याचार, अपहरण यासह गंभीर गुन्ह्याची उकल, तपास अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केला जातो. समाजात सुरक्षितता निर्माण करणे हा पोलिसांच्या कर्तव्याचा भाग आहे. हे काम प्राधान्याने केले पाहिजे.' असे शुक्ला म्हणाल्या.

'गुन्हे अन्वेषणसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. पुरस्कार हा केवळ सन्मान नसून, प्रेरणा आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होते,' असे शुक्ला यांनी नमूद केले. पोलीस निरीक्षक अलका देसाई यांनी सूत्रसंचालन केले. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.