Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता शिस्तभंगविषयक कारवाईमध्ये ई-मेल व व्हॉट्सअॅपचा वापर होणार!

आता शिस्तभंगविषयक कारवाईमध्ये ई-मेल व व्हॉट्सअॅपचा वापर होणार!

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यात आता शासकीय विभागीय कारवाईसाठी ईमेल आणि व्हॉट्सअॅपचा वापर महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे. यासंदर्भात सरकारने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे विभागीय चौकशीतील दोषारोपपत्रे व इतर कागदपत्रे शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना ईमेल व व्हॉट्सअॅपवर पाठवता येणार आहेत.

शासकीय कामकाजात गतिमानता आणि खर्चात बचत होण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये माहिती तंत्रज्ञााचा वापर करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शासकीय कार्यालयात आता ई-मेल सुविधेचा वापर होत असून आता व्हॉट्सअपचादेखील वापर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिस्तभंगाविषयक कारवाईमध्येही सदर माध्यमांचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शासनाने काढलेल्या पत्रकामध्ये नेमकं काय ?

शिस्तभंगविषयक कारवाईमध्ये नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार अपचाऱ्यास अभिवेदन करण्याची संधी उपलब्ध असणे अत्यावश्यक असते. त्यासाठी त्याचेपर्यंत शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याचा पत्रव्यवहार पोहोचणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने सद्यस्थितीत शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याकडून अपचाऱ्याशी होणारा पत्रव्यवहार व्यक्तीशः अथवा पोच देय नोंदणी डाकेने करण्यात येतो. तथापि, काही वेळेस सदर पत्रव्यवहार (दोषारोपाचे ज्ञापन, चौकशी अधिकाऱ्याचा अहवाल इ.) त्याचेपर्यंत वेळेत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनांतर्गत कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ अथवा नियम १० याखाली तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम २७ च्या पोट-नियम (२) (ब) (एक) याखाली बजाविण्यात येणारे दोषारोपाचे ज्ञापन तसेच इतर शिस्तभंगविषयक कागदपत्रे संबंधित अपचाऱ्यास बजाविण्याबाबत खालील माध्यमांचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

1) शिस्तभंगविषयक कागदपत्रे व्यक्तिशः बजाविणेः शासकीय कर्मचारी कर्तव्यार्थ

उपस्थित असल्यास शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याकडून त्यास संबंधित कागदपत्रे/पत्रव्यवहार व्यक्तीशः बजाविण्यात यावे किंवा ती त्याच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत देण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि ती कागदपत्रे/पत्रव्यवहार मिळाल्याची त्याच्याकडून पोच घेण्यात यावी.

२) शिस्तभंगविषयक कागदपत्रे पोच देय नोंदणी डाकेने (RPAD) बजाविणे

अपचाऱ्यास पोच देय नोंदणी डाकेने संबधित कागदपत्रे /पत्रव्यवहार पाठविण्यात यावे. उपरोक्त माध्यमांचा अनिवार्यपणे वापर करण्यात यावा. तसेच याद्वारे प्राप्त झालेली पोच प्रकरणाच्या कागदपत्रांना जोडून ठेवण्यात यावी.

३) उपरोक्त कार्यवाही सोबतच अपचाऱ्यास अधिक जलदगतीने यासंबंधातील कागदपत्रे/पत्रव्यवहार प्राप्त होऊन त्यास आपले अभिवेदन सादर करता यावे. याकरीता खालील माध्यमांचाही वापर करण्यात यावा

अ) शिस्तभंगविषयक कागदपत्रे शासकीय ई-मेलद्वारे बजाविणे :- शासकीय ई-मेल आयडी द्वारे संबंधित अपचाऱ्यास त्याच्या शासकीय ई-मेल आयडी वर तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्याच्या वैयक्तिक ई-मेल आयडी वर शिस्तभंगविषयक कारवाई मधील कागदपत्रे बजाविण्यात यावे. (संबंधित अपचाऱ्याने त्याच माध्यमान्वये पोच द्यावी.)

आ) शिस्तभंगविषयक कागदपत्रे व्हॉट्सअॅपद्वारे बजाविणे :-

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवर शिस्तभंगविषयक कारवाई मधील कागदपत्रे बजाविण्यात यावे. (संबंधित अपचाऱ्याने त्याच माध्यमान्वये पोच द्यावी.)

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.