Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत भाजीविक्रेत्याचा निर्घृण खून पूर्ववैमनस्य, अनैतिक संबंधाच्या कारणाचा संशय

सांगलीत भाजीविक्रेत्याचा निर्घृण खून 
पूर्ववैमनस्य, अनैतिक संबंधाच्या कारणाचा संशय 

सांगली : खरा पंचनामा 

शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील भाजी बाजारात एका भाजी विक्रेत्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. पूर्ववैमनस्य, अनैतिक संबंधाच्या कारणावरून हा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. संशयितांच्या शोधासाठी शहर पोलीस आणि एलसीबीची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.

महेश प्रकाश कांबळे (रा. इंदिरानगर, सांगली) असे खून झालेल्याचे नाव आहे. मृत महेश याचा घाऊक भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी सकाळी ते भाजी विक्रीसाठी नेहमीप्रमाणे शंभर फुटी रस्त्यावरील एका शोरूमसमोर थांबले होते. त्यावेळी दोन संशयित तेथे आले. त्यांनी अचानक कांबळे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यावेळी अन्य भाजी विक्रेते आणि ग्राहक तेथून निघून गेले. कांबळे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर निघून गेले. 

मृत महेश कांबळे याने नोव्हेंबर 2021 मध्ये फिरोज उर्फ बडे शेरअली  शेख (वय 45, रा. जुना कुपवाड रोड, सांगली) याचा खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे शेख याच्या मुलांनी हा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यावर एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके पाठवण्यात आली आहेत. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.