Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एसटीने मोपेडवरील महाविद्यालयीन तरुणीला चिरडलेसांगलीत आंबेडकर रस्त्यावर अपघात

एसटीने मोपेडवरील महाविद्यालयीन तरुणीला चिरडले
सांगलीत आंबेडकर रस्त्यावर अपघात

सांगली : खरा पंचनामा

शहरातील आंबेडकर रोडवर एसटी बसच्या चाकाखाली सापडून मोपेडवरील महाविद्यालयीन तरुणीचा  मृत्यू झाला. जय मातृभूमी व्यायाम मंडळासमोर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.

शर्वरी राजकुमार कुलकर्णी (वय 21, रा. हरिपूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. शर्वरी आज सकाळी मोपेडवरून (एमएच 10 सीजे 2457) हरिपूर येथून आंबेडकर रोडवरून महाविद्यालयात निघाली होती. त्याचवेळी जमखण्डीहुन मुंबईला जाणारी बस (एमएच 14 एलएक्स 5928) त्याच रस्त्यावरून जात होती. त्यावेळी बस तिच्या दुचाकीला घासली. त्यात ती खाली पडली. त्यावेळी बसच्या मागील चाकखाली ती सापडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर शर्वरी हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेने परिसरातील हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत शर्वरी ही सांगलीतील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होती. ती आई आणि बहिणीसोबत हरिपूर येथे राहत होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.