पत्नीच्या खुनप्रकरणी पतीला अटक
सोलापूर जिल्ह्यात सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विजयनगर येथील शाहूनगर येथे चरित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून केल्याप्रकरणी संशयित पतीला सोलापूर जिल्ह्यातील आंत्रोळी येथून अटक करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
पिंटू तुकाराम पाटील (वय ३६, रा. शाहूनगर, विजयनगर, सांगली, मुळ गाव हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शिलवंती पिंटू पाटील (वय 30) असे मृत महिलेचे नाव आहे. पाटील दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सांगलीतील शाहूनगर येथे रहात होते. हे दाम्पत्य मजुरीसाठी सांगलीत आले होते. त्यांना 9 आणि 7 वर्षांची दोन मुले आहेत. या दोघांमध्ये किरकोळ करणावरून तसेच पिंटू शिलवंतीवर चरित्र्याचा संशय घेत असल्यामुळे भांडण होत होती.
बुधवारी रात्रीही त्यांच्यात भांडण झाले होते. शिलवंती झोपल्यानंतर पिंटूने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात, कपाळावर, तोंडावर जबर मारहाण केली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तो मुलांना घेऊन तेथून निघून गेलाहोता. हा खून पिंटूने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली आहेत.
त्याच्या शोधासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक सोलापूर जिल्ह्यात पाठवले होते. पथकातील गुंडोपंत दोरकर यांना पिंटू मंगळवेढा तालुक्यातील आंत्रोळी येथे असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे जाऊन त्याला अटक केली. त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, गुंडोपंत दोरकर, संदीप पाटील, अतुल माने, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, अभिजीत माळकर, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, सुमित सुर्यवंशी, सुशांत चिले, सायबर पोलीस ठाणेकडील अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.