Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'भटारखाने गलिच्छ, सडक्या भाज्या'दहा रिसॉर्ट्सवर FDA चे छापे

'भटारखाने गलिच्छ, सडक्या भाज्या'
दहा रिसॉर्ट्सवर FDA चे छापे

लोणावळा : खरा पंचनामा

मान्सूनच्या सुरूवातीस अन्न व औषध प्रशासन विभागा (FDA) कडून लोणावळ्यात मोठी कारवाई केली. अन्न व औषध प्रशासन विभागा  च्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून शनिवार, २१ जूनला लोणावळ्यातील दहा ठिकाणी छापे टाकण्यात आले.

एफडीएच्या छापेमारीत बहुतांश ठिकाणी मुदतबाह्य पदार्थ आढळून आले आहेत. त्यामुळे आता मान्सूनमध्ये लोणावळ्यात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना रिसॉर्टस्, हॉटेल्सना भेटी देताना गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छापेमारीत बहुतांश ठिकाणी मुदतबाह्य पदार्थांचा वापर करून खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आले. एफडीएकडून तुंगार्ली परिसरातील लगुना रिसॉर्ट, आबेटेल ग्रँड रिसॉर्ट, हिदम हॉटेल, डेला अॅडव्हेंचर अॅण्ड रिसॉर्ट, स्टर्लिंग हॉलिडे रिसॉर्ट, हॉटेल कैलाश पर्वत, किनारा व्हिलेज, ग्रीन लॅन्ड डेलसोल, कुमार रिसॉर्ट्स अॅण्ड अॅम्युजमेंट प्रा. लि. व जे. जे. हॉटेल्स अॅण्ड रिसॉर्ट्स या दहा ठिकाणी तपासणी करण्यात आली.

औषध व प्रशासन विभागाचे सह-आयुक्त सुरेश देशमुख यांनी छापेमारीसंदर्भात माहिती दिली. मुदतबाह्य डाळी, पिठे, ब्रेड, चिकन, फिश फिंगर, मसाले, सडक्या भाज्या, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची एकाच फ्रीजमध्ये केलेली साठवणूक या गोष्टी तपासणीत आढळून आल्याचे सह-आयुक्त सुरेश देशमुख यांनी सांगितले. यात सर्व रिसॉर्ट्स, हॉटेल्सचे भटरखाने अतिशय गलिच्छ असून स्वच्छतेचे प्राथमिक निकष देखील पाळले गेले नसल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागा कडून कारवाईसंदर्भात प्रस्ताव तयार करून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या सर्व हॉटेल्स, रिसॉर्टसना अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली असून त्रुटींची पूर्तता न झाल्यास परवाना रद्द केली जाईल, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.