मोक्यातून कारागृहाबाहेर आलेल्या गुन्हेगाराचे दणक्यात स्वागत करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा
सांगली शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मोकाअंतर्गत कारागृहात असलेला गुन्हेगार बाहेर आल्यावर त्याचे जंगी स्वागत करत फटाक्यांची आतिषबाजी करणाऱ्या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याने ही कारवाई केल्याचे सांगली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
संग्राम सुरेश जाधव (रा. पंचमुखी मारुती रोड, खणभाग, सांगली), निलेश प्रमोद जाधव (रा. पंचमुखी मारुती रोड, खणभाग, सांगली), कैवल्य सुधाकर गवळी (रा. पंचमुखी मारुती रोड, खणभाग, सांगली), अक्षय ब्रम्हनाथ दुगे (रा. नवीन धनगर गल्ली, गोसावी गल्ली, सांगली), अक्षय दिलीप माने (रा. महात्मा गांधी शाळेजवळ, सांगली), ओंकार नंदकुमार जाधव (रा. विश्रामबाग सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
ओंकार जाधव हा पंढरपुर पोलीस ठाणेकडील मोक्का व खुनाचे गुन्हयात जेलमधुन जामिनावर बाहेर आलेचे कारणावरुन आरोपी यांनी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून, आरडाओरडा करुन दंगा करुन फटाके फोडून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचा अवमान करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला आहे. तसेच पोलीसांनी दिले आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, सतीश लिंबळे, विनायक शिंदे, रफीक मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, गणेश कोळेकर, विशाल कोळी, दिग्वीजय सांळुखे, योगेश हाक्के यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.