पाच लाखांच्या खंडणीप्रकरणी गुंड बाळू भोकरेला अटक
घटनेनंतर चार तासात सांगली शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
पेव्हिंग ब्लॉकच्या कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराच्या पर्यवेक्षकाला एडक्याने धमकावून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी नामचीन गुंड बाळू उर्फ बाळ्या भोकरे याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर केवळ चार तासात ही कारवाई केल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
महेंद्र ऊर्फ बाळू वसंत भोकरे (वय ५०, रा. भुईराज सोसायटी, गणेशनगर, सांगली) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. दि. 25 जुलै रोजी गणेशनगर येथील पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम सुरु होते. तेथे अजय लोखंडे पर्यवेक्षक म्हणून काम करत होते. त्यावेळी बाळू भोकरे तेथे आला. त्याने लोखंडे यांना हे काम कोणाचे सुरु आहे. येथे कोणी काम करायचे नाही असे बोलून कामगार रामलखन पासवान याला मारणेसाठी अंगावर धावून गेला. तसेच लोखंडे यांना "एडक्यासारखे हत्यार दाखवून म्हणाला की, काम बंद करा नाहीतर येथील जेसीबी व ट्रॅक्टर फोडून टाकतो. तुम्हाला काम करायचे असेल तर मला पाच लाख रुपये खंडणी दया, "खंडणी दिली नाही तर काम करायचे नाही तसेच परत काम चालू केलेस तुम्हाला ठार मारतो," अशी धमकी दिली. त्यानंतर लोखंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
निरीक्षक मोरे यांनी भोकरे याला तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याला तातडीने अटक केली. वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, सतीश लिंचळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, दिग्विजय सांळुखे, योगेश सटाले, विशाल कोळी, संदीप कोळी, योगेश हाक्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.