पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीच्या प्रशिक्षकाची प्रशिक्षणार्थी तरुणीकडे नको ती मागणी
भंडारा : खरा पंचनामा
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या एका अॅकॅडमीच्या प्रशिक्षकानं त्याच्याकडं प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी केली. एवढ्यावरचं हा अॅकॅडमीचा शिक्षक नं थांबता त्यानं तरुणीच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार भंडाऱ्याच्या अड्याळ इथं घडलाय.
दरम्यान, याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी तरुणीच्या मित्राच्या तक्रारीवरून अॅकॅडमीच्या प्रशिक्षकाविरुद्ध 75 (2), 351, 352(2) सहकलम 3(1) (आर) (एस) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करून रात्री अटक केली आहे. नितेश हिवरकर (वय 39, रा. सोनेगाव ठाणे ता. पवनी जि भंडारा) असं आरोपी प्रशिक्षकाचं नाव आहे. आरोपी नितेश हिवरकर याची स्वतःचीच ही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी असून तोच तिथं प्रशिक्षक आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.