डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य सहसमन्वयकपदी अभिजित बसुगडे
संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिले नियुक्तीचे पत्र
मुंबई : खरा पंचनामा
डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य सहसमन्वयकपदी खरा पंचनामा वेब पोर्टलचे कार्यकारी संपादक अभिजित बसुगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या सहीने ही नियुक्ती करण्यात आली असून राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्याहस्ते हे पत्र देण्यात आले.
डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना डिजिटल मीडियामधील पत्रकारांसाठी कार्यरत आहे. डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक अर्थ सहाय्यासाठी तसेच वैद्यकीय मदतीसाठी ही संघटना कार्यरत आहे. पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक अर्थ सहाय्य प्रतिबिंब प्रतिष्ठानकडून उपलब्ध करून दिले जाते. शिवाय डिजिटल मीडियातील पत्रकारांना वैद्यकीय मदत देण्यासाठीही संघटना प्रयत्नशील असते.
श्री. बसुगडे यांच्या निवडीनंतर पत्रकारांचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर कार्यरत राहणार असून संघटना वाढीसाठीही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.