Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जसे माधुरीचे व्हिडीओ पुढे येतात, तसा शासनाच्या नेण्यात आलेल्या हत्तीचा व्हिडीओ का पुढे येत नाही?

जसे माधुरीचे व्हिडीओ पुढे येतात, तसा शासनाच्या नेण्यात आलेल्या हत्तीचा व्हिडीओ का पुढे येत नाही?

मुंबई : खरा पंचनामा

महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले म आहेत. माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात नेण्यात आलंय. मात्र, त्यानंतर तिला परत आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

कोल्हापूरजवळच्या नांदणी मठात गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळ राहणारी 'महादेवी हत्तीण राहिली आहे. आता महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित याबाबत बैठक आयोजित करण्यात आलीये. या बैठकीला कोल्हापूर भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत.

राजू शेट्टी देखील या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी म्हटले की, मेडिकल रिपोर्ट सांगतो की, तिला मल्टीपल फॅक्चर आहेत, तिला संधिवात आहे. मग वेगवेगळे नऊ रिपोर्ट देणारे आपल्या महाराष्ट्र शासनाचे अधिकारी चुकीचे आहेत की, काहीही करून आम्हाला हत्ती पाहिजे म्हणून तिला मल्टीपल फॅक्चर आहेत तिला संधिवात आहे हे सांगितले गेले.

पुढे ते म्हणाले की, सरळ सरळ दिशाभूल केली गेलेली आहे. हे फक्त माधुरी हत्तीबद्दल झाले नाही तर शासनाचे अधिकारी वनतारामध्ये झाले आहे. जसे माधुरीचे व्हिडीओ पुढे येत आहेत, तसा शासनाच्या नेण्यात आलेल्या हत्तीचा व्हिडीओ का पुढे येत नाही. आम्हाला आमचा हत्ती पाहिजे आहे, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले. इतर वेगवेगळ्या देवस्थानांचे जे हत्ती आहेत, तासगावच्या देवस्थानचा हत्ती आहे किंवा इतर आहेत, त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका. शासनाने हवे तर वेळोवेळी तपासण्या करा. पण कोणालातरी पाहिजे म्हणून आम्ही आमचे हत्ती देणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहण्यासारखे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी माधुरी हत्तीणीला नेल्यानंतर चांगलेच आक्रमक होताना स्पष्ट दिसत आहेत. वनताराकडून सातत्याने माधुरी हत्तीणीचे व्हिडीओ शेअर केली जात आहेत. वनतारामध्ये माधुरी हत्तीणीचा दिनक्रम कसा आहे, हे दाखवले जात आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, माधुरी हत्तीला वनतारामध्येच राहू द्या. सतत माधुरीच्या आरोग्याबद्दल वनताराकडून अपडेट दिली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.