वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर...
फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी
बीड : खरा पंचनामा
महादेव मुंडे खून प्रकरणातला क्रमांक एकचा आरोपी वाल्मिक कराडचा पंटर गोट्या गित्तेचा सध्या फरार आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तो राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देत आहे.
वाल्मिक कराड हे गोरगरीबांचे दैवत आहे तर धनंजय मुंडेंची तुम्ही विनाकारण बदनामी करत आहात, तुम्ही माझ्यावरही काही खोटे आरोप केले तर मी चिठ्ठीत तुमचे नाव लिहून आत्महत्या करणार असल्याची धमकी त्याने आव्हाडांना दिली आहे.
व्हिडिओत गोट्या गिते रेल्वे रुळावर बसून बोलत आहे. तो म्हणतो की, जितेंद्र आव्हाड, संदीप, खासदार सोनावणे, अंजली दमानिया हे माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. मी मंदिरातील मुखवटा चोरला असा आरोप जितेंद्र आव्हाड करतात तर अंजली दमानिया यांनी मी मुली उचलून नेतो असा आरोप केला आहे. जर हे आरोप खरे असतील तर माझ्यावर दाखल झालेले गुन्हे दाखवा किंवा त्याचे पुरावे माध्यमांना द्या. पण विनाकारण माझ्यावर कोणतेही आरोप करु नका, माझ्यावर जे गुन्हे दाखल आहेत त्याची सजा मला होईल पण विनाकारण खंडणी, दरोडेसारखे गुन्हे करतो. वाल्मिक कराडचा उजवा हात असल्याचे बिनबुडाचे आरोप करु नका. असं तो म्हणतो.
जितेंद्र आव्हाड वंजारी असून मला बदनाम करायला लागले आहेत मला वाटते ते वंजारी समाजाचे नाहीये. माझा मित्र बापू आंधळेला बबन गित्तेने माझ्यासमोर दोन गोळ्या घालून मारलं. त्याच्यावर जितेंद्र आव्हाड काहीच बोलत नाही. ते शरद पवार यांच्या पक्षाचे आहेत. खून करणारा बबन गित्ते पण त्याच पक्षाचा होता मग त्यावेळी तुम्ही आवाज का उठविला नाही? तोही वंजारीच होता. वंजारी असो मराठा असो आपल्याला काय नाही पण संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पण तुम्ही विनाकारण तुमच्या राजकारणासाठी वाल्मिक कराड यांच्या मागे लागला आहात. धनंजय मुंडे तुमच्या भागात आले तर तुम्ही परळीत तुमच्या पक्षाचा सभेला यायचे होते. तुम्ही धनंजय मुंडेंना टार्गेट करु नका, तुम्ही परळीतील गोरगरीबांचे दैवत असणाऱ्या वाल्मिक कराडलाही टार्गेट करत आहात. असं गोट्या गिते बोलताना दिसत आहे.
तो पुढे म्हणतो की, तुम्ही मला टार्गेट का करताय? हे मला माहित्येय, बबन गितेच्या प्रकरणात मी फिर्यादी होतो, मला दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यावेळी तुम्ही वंजारी समाजाचे असून कुठे होता? आता तुम्ही महिलांना उचलण्याचा आरोप करताय पण माझ्या चार हजार लोकसंख्येच्या गावात जाऊन कोणत्याही महिलेला विचारा की मी कोणसोबत काही वाईट कृत्य केले आहे का? जर ते खरं असेल तर मी फाशी घेईन नाही तर असं रुळावर पडून आत्महत्या करेन पण तुम्ही तुमची राजकारणची पोळी भाजू नका.
मी गोटू गित्ते लहानसहान माणूस आहे, मला फाशी भेटेल न भेटेल तो भाग वेगळा, पण बापू आंधळेच्या खुनातील आरोपी बबन गित्ते हा तुमच्या पक्षाचा आहे तो का हजर होत नाही. जर तुम्ही माझ्यावर काही आरोप कराल तर मी चिठ्ठीत तुमचं नाव लिहून जीव देईन अशी धमकीच गोट्या गितने जितेंद्र आव्हाडांना दिली दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.