बारावीच्या ५८१ विद्यार्थ्यांची उत्तरं 'सेम टू सेम'; २६ शिक्षक निलंबित
वाशीम : खरा पंचनामा
शिक्षकांनीच १२वीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिममधील एका महाविद्यालयात हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २६ शिक्षकांना निलंबित करण्यात आलं असून विध्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव अमरावती बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकारानंतर शैक्षणिक वर्तुळात विविध चर्चाही रंगू लागल्या आहेत.
राज्यात १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. पण या परीक्षेत उघडपणे कॉपीचे प्रकार सुरु असल्याचं आता पुढे आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी शिक्षकच विद्यार्थ्यांना मदत करत आहेत. वाशिकमध्ये संत मैनागिरी महाराज विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय गैरप्रकार झाला आहे. या महाविद्यालयात ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचं उघड झालं आहे.
अशातच आता ज्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचीही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती, वाशिम जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिली आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांवरही कारवाई होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, काल इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्राच्या पेपरवेली शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी परीक्षा केंद्रावर तपासणी केली होती. यावेळी काही विध्यार्थ्यांच्या उत्तरात त्यांना समानता आढळून आली होती. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी सर्वच वर्गखोल्यातील सीसीटीव्ही तपासले. त्यात हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.