Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'नीट'चा आरोपी तुरुंगात अभ्यास करून देणार परीक्षा, विशेष न्यायालयाने दिली मंजुरी

'नीट'चा आरोपी तुरुंगात अभ्यास करून देणार परीक्षा, विशेष न्यायालयाने दिली मंजुरी

दिल्ली : खरा पंचनामा 

'नीट'चा पेपर फोडणारा आरोपी आता तुरुंगात अभ्यास करून परीक्षा देणार आहे. यश यादव असे त्याचे नाव आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेची तयारी करता यावी, यासाठी यशने न्यायालयाकडे पुस्तकांची मागणी केली होती. त्यानंतर त्याने ही प्रश्नपत्रिका तब्बल 10 लाख रुपयांना इतर विद्यार्थ्यांना विकल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.

'नीट'च्या फेरपरीक्षेला बसण्यासाठी यश यादवला विशेष न्यायालयाने राज्यघटनेतील 'कलम 21'चा संदर्भ देत मंजुरी दिली. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी 2 जून रोजी झालेल्या सुनावणीत हा आदेश दिला. 'आरोपीची पुढील शिक्षणाची इच्छा आणि जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार लक्षात घेता, हा अर्ज मंजूर करण्यात येत आहे,' असे न्यायालयाने स्पष्ट केले.

एकीकडे पेपरफुटीच्या गंभीर आरोपामुळे वैद्यकीय क्षेत्रातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असताना दुसरीकडे मुख्य आरोपीलाच आता तुरुंगात 'नीट'च्या फेरपरीक्षेची तयारी करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

न्यायालयाने यश यादवला अभ्यासाची परवानगी दिली असली तरी त्यासाठी काही कडक अटी आणि शर्थी घातल्या आहेत? आरोपीला आधी कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे, याची यादी द्यावी लागेल. ही पुस्तके त्याचे कुटुंबीय किंवा वकिलांमार्फत जेल प्रशासनाकडे सुपूर्द केली जातील. जेल मॅन्युअलनुसार या पुस्तकांची कसून तपासणी केली जाईल. तपासणीदरम्यान कोणतेही पुस्तक किंवा मजकूर आक्षेपार्ह किंवा प्रशासनाला असतील.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.