विवेकानंद केंद्रात युवा नेतृत्व विकास उपक्रमाची उत्साही सुरुवात
सांगली : खरा पंचनामा
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, सांगली शाखेच्या युवा नेतृत्व विकास उपक्रमाची उत्साहात सुरुवात झाली. डॉ. अनिल मडके व गजानन लोहगावकर यांच्या हस्ते उपक्रमाचे पोस्टर व नोंदणी लिंकचे अनावरण करण्यात आले. सारंग काबरा यांची उपक्रम समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
रविवारी स्वाध्याय वर्ग, एकदिवसीय शिबीर व पाच दिवसांचे निवासी शिबीर अशा विविध टप्प्यांत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १८ ते ४० वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून नेतृत्वगुण, संघभावना, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.