राज्यपालांच्या निवासस्थानी जवानाची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं
मुंबई : खरा पंचनामा
राज्यपालांच्या निवासस्थानी जवानाने आत्महत्या केल्याची घटना घडली. मलबार हिल परिसरातील राजभवनात ड्युटीवर असताना जवानाने स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं. या घटनेमुळे राजभवन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकभवनातील एरआरपीएफ कॅम्पमध्ये ही घटना घडली. या घटनेचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. या जवानाने टोकाचे पाऊल का उचलले? यामागचे कारण अस्पष्ट आहे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुब सांगळे असं आत्महत्या केलेल्या या जवानाचे नाव होते. कौस्तुभ राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत होते. ते राजभवनात ड्युटीवर होते. त्याचवेळी त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रायफलने गोळी झाडून आत्महत्या केली. या जवानाच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कौस्तुभ सांगळे हे पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत होते. ते मूळचे नाशिकचे होते. ते कोल्हापूरच्या एसआरपीएफ ग्रुप १६ तुकडीमध्ये कार्यरत होते. कौस्तुभ यांची नियुक्ती सध्या राज्यपालाच्या निवासस्थानी करण्यात आली होती.
कौस्तुभ हे सोमवारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर आले. राजभवन परिसरात असलेल्या लोक भवन येथे ते ड्युटीवर होते. त्यांनी ड्युटीवर असताना अचानक स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसर हादरला. या घटनेमुळे राजभवनात एकच गोंधळ उडाला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या कौस्तुभ यांचा जास्त रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
पोलिसांनी कौस्तुभ यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जे.जे रुग्णालयात पाठवला. कौस्तुभ यांनी कौटुंबीक वादातून आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळावर पोलिसांनी सुसाईड नोट देखील सापडली नाही. मलबार हिल पोलिस सध्या त्यांच्या आत्महत्या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.