तो शब्द भाजपच्या जिव्हारी; राहुल गांधींविरोधात हक्कभंग प्रस्ताव, केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर आक्रमक, खासदारकी धोक्यात?
नवी दिल्ली : खरा पंचनामा
NEET-UG पेपरफुटीनंतर जंतरमंतरवर CJP ने विद्यार्थ्यांसाठी आंदोलन छेडले. नीट पेपरफुटीतील आरोपींना कडक शिक्षा, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि इतर महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या.
सरकारने 2024 मधील याविषयीच्या कायद्यात सुधारणेसाठी सार्वजनिक परीक्षा (दुरुस्ती) विधेयक, पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे आणले. लोकसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर जळजळीत टीका केली. वेळीच विद्यार्थी आंदोलनाची दखल घेतली असती तर हा मुद्दा चिघळला नसता असे त्यांनी सरकारला सुनावले. त्याचवेळी त्यांनी मोदी सरकारवर शाब्दिक वार केले. ही बोचरी टीका सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली. राहुल गांधी हे सर्वात मोठे उपद्रवी असल्याची टीका करत केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला आहे. खरंच राहुल गांधी यांची खासदारकी धोक्यात आली आहे का?
लोकसभेतील चर्चेदरम्यान गुरूवारी दुपारी राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना शाब्दिक तडाखे दिले. त्यांची देहबोली आणि शब्दबोलीवर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप नोंदवला. संसदीय नियमांचे पुस्तक समोर करत त्यांनी राहुल गांधी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. एका उदाहरणाअडून राहुल गांधींनी स्टुडंट्स, इडियट आणि अंधभक्त ही शब्दावली वापरली आणि सत्ताधाऱ्यांचा तिळपापड झाला. इतक्या विरोधी पक्षनेते थांबले नाहीत. त्यांनी गृहमंत्रालयाच्या आदेशानेच विद्यार्थ्यांवर जंतरमंतर आणि दिल्लीतील अनेक परिसरात लाठीहल्ला आणि पेलेट गनचा वापर केल्याचा घणाघात घालताच एकच गदारोळ उठला. सत्ताधारी संतापले. खासदार अनुराग ठाकूर यांनी तर राहुल गांधी हे र्वात मोठे उपद्रवी असल्याची टीका केली.
राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेतील भाषणा दरम्यान विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त अशा शब्दांचा मारा केला. सत्ताधाऱ्यांवर त्यांची ही खोचक प्रतिक्रिया मानली जाते. त्याचाच आधार गेते संसदीय मर्यादांचे उल्लंघन केल्याचा ठपका गांधींवर ठेवण्यात आला. नियम 352 (ii), (iii) आणि (vii) दाखला देण्यात आला. विरोधी पक्ष नेत्याचे शब्द सभागृहाच्या पटलावरून हटवण्यात आले. आता अनुराग ठाकूर यांनी विशेष अधिकाराचे हनन झाल्याचा ठपका ठेवत राहुल गांधींविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
अनुराग ठाकूर यांच्यासोबतच लोकसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद संजय जयस्वाल यांनीही लोकसभा अध्यक्षांना काँग्रेस नेत्याविरोधात कारवाईसाठी पत्र दिले आहे. हक्कभंगाचा प्रस्ताव आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. अध्यक्ष या प्रस्तावावर नियमानुसार योग्य ती तपासणी करून पुढील निर्णय घेतली. खासदारकी रद्द होण्याविषयी कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.