Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'पक्षात या, नाहीतर गोळ्या घालू !' भाजपकडून थेट धमकी; अभिजीत दीपकेंचा खळबळजनक आरोप

'पक्षात या, नाहीतर गोळ्या घालू !' 
भाजपकडून थेट धमकी; अभिजीत दीपकेंचा खळबळजनक आरोप

मुंबई : खरा पंचनामा 

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. राजकारणात दबावाचे वातावरण निर्माण केले जात असून, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यावर सातत्याने दबाव टाकण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला. तसेच, कुटुंबीयांना देखील धमक्या दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

अभिजीत दीपके म्हणाले की, "तू भाजपात ये, नाहीतर तुला गोळ्या घालू!" अशा प्रकारच्या धमक्या मला देण्यात आल्या. एवढेच नव्हे तर आंदोलन मागे घ्यावे, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही वारंवार सांगण्यात आले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आपण आपली भूमिका बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दीपके यांनी सांगितले की, मला भाजपमध्ये सामील होण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, मी ती स्पष्टपणे नाकारली. "जर मला भाजपमध्ये जायचेच असते, तर मी आतापर्यंत कधीच गेलो असतो. पण माझा निर्णय ठाम आहे आणि मी कोणत्याही दबावाखाली पक्षात प्रवेश करणार नाही," असे त्यांनी सांगितले.

"ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेमाची भाषा आहे," असे म्हणत त्यांनी विरोध करणाऱ्यांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. या सर्व प्रकारामुळे त्यांच्या आई-वडिलांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या वयाचा उल्लेख करत दीपके म्हणाले की, "माझे वय सध्या केवळ तीस वर्षे आहे. वयाच्या हिशोबाने पाहिल्यास मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नातवाच्या वयाचा किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्या नातवाच्या वयाचा असेन." अशा वयाच्या तरुणाला धमक्या देणे हे दुर्दैवी आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.