Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रुपाली चाकणकरांची पहिली रिप्लेसमेंट वैशाली नागवडे... महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी आता 4 नावांची चर्चा

रुपाली चाकणकरांची पहिली रिप्लेसमेंट वैशाली नागवडे... 
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी आता 4 नावांची चर्चा

मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडेंची नियुक्तीची घोषणा बुधवारी करण्यात आली. याचवेळी युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे, तर विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी अॅड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडी जाहीर होताच रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी या चार महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत. या पदावर आता या चौघींपैकी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अखेर रुपाली चाकणकरांना उत्तराधिकारी शोधला आहे. चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून शिगेला पोहचली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी पुण्याच्या माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्या राजलक्ष्मी भोसले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्ह्यातील महिला नेत्या व नाशिकच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांचे यांचे नाव चर्चेत आहे.

त्यासोबतच सामाजिक क्षेत्रातील चळवळीत सक्रिय असणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या असलेल्या प्रतिभा शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. त्यासोबतच या पदासाठी बीडच्या सामाजिक कार्यकर्त्या ज्योती मेटे यांचेही नाव चर्चेत आहे. पण त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसल्याने त्यांना प्रवेश केला तरच त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता लवकरच महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राजलक्ष्मी भोसले, प्रेरणा बलकवडे, प्रतिभा शिंदे, ज्योती मेटे या चार महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत. या चौघीपैकी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.