महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात धक्कादायक निकाल, ब्रिजभूषण सिंह यांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता !
दिल्ली : खरा पंचनामा
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने या प्रकरणात ब्रिजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
जानेवारी 2023 मध्ये, अनेक महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करत दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केलं होतं.
यानंतर, कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, ज्याने दिल्ली पोलिसांना कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. अल्पवयीन पैलवानाशी संबंधित प्रकरणाचा तपास केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. 26 मे 2025 रोजी, न्यायालयाने ब्रिजभूषण शरण सिंग यांना पॉक्सो प्रकरणात आरोपांमधून निर्दोष मुक्त करून दिलासा दिला. त्यामध्ये सहा प्रौढ महिला पैलवानांच्या तक्रारींचा समावेश आहे.
ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले होते. ज्या सहा कुस्तीपटूंवर चुकीचं घडलं. त्याच मी देखील होते, असं विनेश फोगाटने आरोप केला होता. त्यावेळी पुरूष कुस्तीपटूंनी देखील महिला कुस्तीपटूंना आंदोलनात जंतर मंतरवर पाठिंबा दिला होता. अशातच आता फोगाटसह कुस्तीपटूंच्या आंदोलनाला अपयश आल्याचं पहायला मिळतंय.
कोर्टात खटल्याच्या सुनावणीदरम्यान, पाच तक्रारदारांपैकी दोन महिला कुस्तीपटूंनी न्यायालयात त्यांच्या पूर्वीच्या आरोपांचे समर्थन केले नाही. त्यानंतर खटल्याची सुनावणी प्रामुख्याने त्या तीन महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांच्या आधारावर पुढे चालली, ज्यांनी याच आरोपांच्या आधारे आपला अंतिम युक्तिवाद पूर्ण केला. न्यायालयासमोर 44 साक्षीदारांची यादी सादर केली, त्यापैकी 32 जणांनी साक्ष दिली होती. त्याच्या आधारे कोर्टाने निकाल जाहीर केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.