Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन

माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन

कोल्हापूर : खरा पंचनामा 

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि बिहार, त्रिपुरामधील माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

त्यांच्या निधनाने महाराष्ट्र तसेच देशातील शिक्षण आणि राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना 'पद्मश्री' या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांत शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे उभारले. शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.