कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश कुणाचे? मनोज जरांगेंनी थेट नावच जाहीर केले
जालना : खरा पंचनामा
मराठवाड्यातील नवीन कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. त्यामुळे काही निवडून आलेले लोकप्रतिनिधी अडचणीत आले. 15 लाख रुपयांसाठी हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.
अंतरवाली सराटीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली. कुणाच्या आदेशाने कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले याचे नावच त्यांनी उघड केले. कोणत्या मंत्र्यांच्या आदेशाने हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले हे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
कालपासून राज्यात सरकार पासून एक कट शिजला गेला. फडणवीस आणि शिंदे यांच्या मंत्र्यांकडून कट शिजला जात आहे. नोंदी त्यांनीच द्यायच्या आणि रद्द सुद्धा त्यांनीच करायचे. मी एकटा पडावा म्हणून सरकार ने जाणून बुजून कट रचला असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. पुरेपूर आणि नियोजित कट सरकारकडून रचला गेला. मी सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली.
सरकारने निवडून मराठ्यांकडून यायचं आणि नंतर मराठ्यांचा घात करायचा. आम्ही 2029 ला सर्वात मोठा बदला घेऊ. ज्योती शिंदे यांचं प्रमाणपत्र तुम्ही कायमच रद्द करा, कोणी दिला आदेश? प्रचंड गैरसमज निर्माण केला गेला. राजकीय द्वेषातून रद्द केले. फडणवीस तुम्ही विनाकारण मराठे अंगावर घेतायत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रद्द करायला सांगत आहेत. यशवंता दहीहंडे यांची उर्दू मधील नोंद सापडली आहे. हीच नोंद ग्रामपंचायत मध्ये लावली. तुमचा (म्हणजे भाजप) उमेदवार निवडून आला नाही म्हणून तुम्ही फोन करून रद्द करायला लावला, असा आरोप जरांगे पाटील यांनी बावनकुळे आणि फडणवीस यांच्यावर केला. जरांगे पाटील लोकप्रतिनिधी यांचे पुरावे दाखवताना संतप्त झाले. सरकारच्या एकाही अधिकाऱ्याकडे इतके पुरावे नसतील, तितके दाखवत आहे. बावनकुळे यांनी सांगितलं की नोंदी रद्द करा. त्यांनी endoncement करून पत्र दिलं असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.