Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महामार्गावर १.४८ कोटींचा अवैध गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्तईश्वरपूर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई

महामार्गावर १.४८ कोटींचा अवैध गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त
ईश्वरपूर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई

पूजा फडके 
ईश्वरपूर : खरा पंचनामा 

गोवा राज्यात निर्मित आणि विक्रीस असलेल्या विदेशी मद्याची महाराष्ट्र राज्यात अवैध वाहतूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीवर राज्य उत्पादन शुल्क (ईश्वरपूर विभाग) पथकाने मोठी कारवाई केली आहे. १ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर पेठ (ता. वाळवा, जि. सांगली) हद्दीतील 'हॉटेल गंधर्व' समोर सापळा रचून तब्बल १ कोटी ४८ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली होती. यादरम्यान संशयितरीत्या जाणाऱ्या एका सहाचाकी ट्रकला थांबवून तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गोवा बनावटीचा मोठा दारूचा साठा आढळून आला.

जप्त करण्यात आलेला मद्यसाठामध्ये गोवा राज्यातील निर्मित व विक्रीसाठी असलेला १२०० बॉक्स विदेशी मद्यसाठा (१०,३६८ बल्क लीटर),जप्त वाहन: अशोक लेलँड (ASHOK LEYLAND) कंपनीचा सहाचाकी ट्रक (क्रमांक: KA 20 AB 3867), इतर साहित्य: एक मोबाईल संच असा एकूण एकूण जप्त मुद्देमाल रु. १,४८,८२,०००/- (एक कोटी अडतीस लाख ऐंशी हजार रुपये) इतका आहे.

या प्रकरणी ट्रक चालक आरोपी सहिराम पोकरराम बिष्णोई (वय ४१ वर्षे, रा. आत्मज पोकरराम केरियानाडा, फिंच, जोधपूर, राजस्थान) याला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा रजि. क्र. १४६/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उप-आयुक्त (कोल्हापूर) विजय चिंचाळकर आणि सांगलीचे अधीक्षक विश्वजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत निरीक्षक तानाजी कदम, दुय्यम निरीक्षक निखील पाटील, संदेश तडवळेकर, मयुरी पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक श्रीपाद पाटील तसेच जवान संतोष वेदे, अभिजित हावळ, सचिन जाधव आणि बजरंग पाटील यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास दुय्यम निरीक्षक (ईश्वरपूर क्र. १) निखील पाटील करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.