Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोयना धरणात २४ तासांत ३.६१ टीएमसी पाण्याची भरमहाबळेश्वर, कोयनानगर, नवजामध्ये पावसाची मुसळधार

कोयना धरणात २४ तासांत ३.६१ टीएमसी पाण्याची भर
महाबळेश्वर, कोयनानगर, नवजामध्ये पावसाची मुसळधार

कराड : खरा पंचनामा 

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची मुसळधार सुरूच आहे. आज मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगरला 105, नवजाला 128 तर महाबळेश्वरला 183 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात कोयना धरणातील पाणीसाठा 3.61 टीएमसीने वाढला आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटावर स्थिर असून धरणातून व पायथावीज ग्रहातून सध्या 24 हजार 908 क्यू से क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणात सध्या 92.38 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे दरवाजे सहा फुटापर्यंत उघडून मोठ्या प्रमाणात विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत होता. मात्र गेल्या दोन दिवसात अधून मधून पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे कोयना धरणातील येणारा पाणीसाठाही कमी झाला होता.

त्यामुळे धरणाचे दरवाजे टप्प्याटप्याने सहा वरून पाच व चार फुटावर खाली आणण्यात आले असून गेल्या दोन दिवसापासून चार फुटांवरील दरवाजे स्थिर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान कोयनानगर, नवजा व महाबळेश्वर परिसरातील पावसाची मुसळधार कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणात केल्या 24 तासात मुसळधार पावसामुळे 3.61 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

कोयना धरणातून सध्या 23 हजार 858 क्यूसेक व पायथा वीज ग्रहातून 1050 असा 24 हजार 908 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपत्रात करण्यात येत आहे त्यामुळे कृष्णा कोयना नद्यांचे पाणी पातळी वाढली आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्याचे प्रमाण वाढू लागल्यास धरणाचे दरवाजे आणखी उघडून पाण्याचा विसर्ग केला जाईल असे कोयना धरण व्यवस्थापनाने कळवले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.