Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

४ कोटी २ लाख रुपयांचा जप्त मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द!विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांच्याहस्ते वितरण : सांगली पोलीस दलाची धडक कामगिरी

४ कोटी २ लाख रुपयांचा जप्त मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द!
विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा यांच्याहस्ते वितरण : सांगली पोलीस दलाची धडक कामगिरी

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्हा पोलीस दलाने धडक कारवाई करत विविध गुन्ह्यांत जप्त केलेला तब्बल ४ कोटी २ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम मूळ मालक, फिर्यादी आणि साक्षीदारांना परत केली आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते आणि सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक  तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम पार पडला.

जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण ५० गुन्ह्यांमधील कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून हा मुद्देमाल नागरिकांना वेळेत परत करण्यात आला आहे.

परत करण्यात आलेल्या मुद्देमाल तपशील असा आहे.
सोन्याचे दागिने: १३४ तोळे (किंमत: ₹१,३४,००,०००/-), चांदीचे दागिने: ४० किलो (किंमत: ₹१,२०,००,०००/-),  मोबाईल संच: २८३ मोबाईल (किंमत: ₹५७,५०,०००/-).

ऑनलाईन फसवणुकीतील परत केलेली रक्कम: ₹९७,३२,०००/-
 बेदाणा: १४३० किलो (किंमत: ₹७३,४८,०००/- एकूण हस्तांतरित मुद्देमाल: ₹४,०२,८२,०००/-
इतका आहे.

पोलीस दलाच्या या पारदर्शक आणि गतिमान कारभारामुळे जप्त मुद्देमालाचे सुरक्षित व्यवस्थापन तर झालेच, शिवाय नागरिकांना त्यांचा हक्काचा ऐवज वेळेत परत मिळाल्याने नागरिकांमधून सांगली पोलीस दलाचे विशेष कौतुक व आभार व्यक्त केले जात आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.