Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमित शाहांनी नाकारली सुनेत्रा पवारांची भेट'त्या' व्यक्तीच्या एन्ट्रीमुळं भाजप-NCPमध्ये मिठाचा खडा?

अमित शाहांनी नाकारली सुनेत्रा पवारांची भेट
'त्या' व्यक्तीच्या एन्ट्रीमुळं भाजप-NCPमध्ये मिठाचा खडा?

मुंबई : खरा पंचनामा 

भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारं काही अलबेल नसल्याचं समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच, अमित शाहा यांच्या नाराजीचे कारणही समोर आलं आहे. प्रशांत किशोर यांच्या एन्ट्रीने भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मिठाचा खडा पडला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
अमित शाहा यांनी काल सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाहांनी भेट नाकारल्यानं सुनेत्रा पवार पुण्याल्या गेल्याची चर्चाही रंगली आहे. अमित शाह दोन दिवस मुंबई दौ-यावर होते. मात्र या दौ-यादरम्यान सुनेत्रा पवार कुठेही दिसल्या नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चाना उधाण आलं आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांच्या स्वागतासाठी राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. तसंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे अमित शाह यांच्या मुंबईतील कार्यक्रमावेळी दिसून आले होते. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दौऱ्यात कुठेच दिसल्या नाही. त्यामुळं राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी मुंबईत अमित शांह यांचा कार्यक्रम सुरू असताना सुनेत्रा पवार पुण्यातच दुपारपर्यंत जिजाईवरच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होत्या.

सुनेत्रा पवार शनिवारी अनुपस्थित असल्याने वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहे. प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठीची किनार या विषयाला जोडली जात आहे. प्रशांत किशोर हे भाजपला हरवून बिहारमधे आमदार बनलेत. त्यामुळं प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीनं राजकीय रणनीतीकार म्हणून नियुक्ती केल्यानं अमित शाह नाराज असल्याची चर्चा रंगलीये. प्रशांत किशोर यांना भाजपचा तीव्र विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपचा विरोध असताना देखील किशोर हे राष्ट्रवादीच काम पाहत आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यापासून अंतर राखून ठेवले होतं का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.