Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

केंद्रिय मंत्रीमंडळात फेरबदल? महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा पत्ता कट होणार?, संभाव्य नावे समोर

केंद्रिय मंत्रीमंडळात फेरबदल? महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा पत्ता कट होणार?, संभाव्य नावे समोर

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सप्टेंबरच्या सुरुवातीला विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधील काही केंद्रीय मंत्र्यांच्या पदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अद्याप महाराष्ट्रातील कोणत्याही केंद्रिय मंत्र्यांच्या नेत्यांमध्ये फेरबदल होण्याच्या हालचाली दिसत नसल्या तरी ऐनवेळी काहीही राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील रिक्त पदे भरण्यासह कामगिरी आणि वयाच्या निकषांवर काही मंत्र्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. संविधानानुसार केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह जास्तीत जास्त ८१ सदस्य असू शकतात. सध्या काही पदे रिक्त असल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

संभाव्य फेरबदलात ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांसह महिला आणि युवा चेहऱ्यांना प्रतिनिधित्व देण्याचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. तसेच अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या किंवा वयामुळे कामकाजावर परिणाम होणाऱ्या काही मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या बदलल्या जाऊ शकतात.

केंद्रीय मंत्रिमंडळात बिहारमधून सध्या आठ मंत्री आहेत. यामध्ये चार कॅबिनेट मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. संभाव्य फेरबदलाच्या चर्चेत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि कोळसा व खाण राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांची नावे चर्चेत आहेत.

गिरिराज सिंह यांच्या वयाचा मुद्दा चर्चेत असून, त्यांच्या जागी राज्यसभा खासदार विवेक ठाकूर यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. तसेच सतीश चंद्र दुबे यांच्या जागी राज्यसभा खासदार मनन मिश्रा यांचा विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांच्या कामगिरीबाबतही प्रश्न उपस्थित होत असून, त्यांच्या मंत्रिपदाबाबत फेरबदल होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि कोणाला संधी मिळणार किंवा कोणाची जबाबदारी बदलणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे वरिष्ठ नेतृत्व घेणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.