Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

DJ विरोधात आज पुणेकर रस्त्यावर, विद्यानंद बापट ही आंदोलनात सहभागी होणार? मोठी अपडेट समोर

DJ विरोधात आज पुणेकर रस्त्यावर, विद्यानंद बापट ही आंदोलनात सहभागी होणार? मोठी अपडेट समोर

पुणे : खरा पंचनामा 

विद्यानंद बापट गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गणेशोत्सवात वाजवल्या जाणाऱ्या कर्णकर्कश डीजेविरोधात आवाज उठवत आहे. त्यांच्या भूमिकेला जनसामान्यांमधून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तर काहींनी डीजे समर्थन केले आहे. टिळक रोड परिसरात बापट यांना संतोष चव्हाण या तरुणाने मारहाण केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी डीजेला विरोध करण्यासाठी आज पुणेकर रस्त्यावर उतरणार आहे. थोड्याच वेळात पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

डीजे आणि स्पीकरच्या आवाजाविरोधात पुणेकर आज रस्त्यावर उतरणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौक ते पुणे महानगरपालिकेपर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता बालगंधर्व चौक येथून मोर्चा महापालिकेच्या दिशेने निघणार आहे. डीजे विरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट देखील मोर्चात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील लाऊड स्पीकर विरोधी पुणेकर मंचच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

बालगंधर्व चौकात, झाशीची राणी पुतळ्याजवळ एकत्र येऊन पुणेकर डीजे मुक्तीविरोधात आवाज बुलंद करणार आहेत. याठिकाणी पुणे महापालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत रविवारी, 6 सप्टेंबर रोजी आयोजित मोर्चाच सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध पुणेकर करणार आहे.

यापूर्वी माध्यमांशी बोलताना विद्यानंद बापट यांनी नरेंद्र दाभोलकर यांचा उल्लेख करत जर मी जिवंत असेल तर मोर्चात सहभागी होईल असे म्हटले होते. आपल्यावर सवंग प्रसिद्धीसाठी हल्ला करण्यात आल्याचे, मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान आज बापट या मोर्चात सहभागी होतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण विद्यानंद बापट सहभागी होणार नाहीत अशी माहिती विद्यानंद यांनी पोलिसांना दिली आहे. विद्यानंद बापट यांच्या निवासस्थानावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. विद्यानंद बापट यांनी मोर्चामध्ये सामील न होण्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.