Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?

आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?

पुणे : खरा पंचनामा 

गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेलं एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर निर्णय झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण सक्तीच्या रजेवर जात असल्याचं ट्विट केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान आमदार रोहित पवार यांना आंदोलक विद्यार्थ्यांची समजूत काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही दिसत असताना, विद्यार्थी मात्र एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम होते. राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याने आंदोलनस्थळी पेच निर्माण झाला होता. अखेर चौकशी पूर्ण होईपर्यंत विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर विवेक भीमनवार स्वतः सोशल मीडियावर सक्तीच्या रजेवर जात असल्याची पोस्ट करत नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. यानंतर सरकारला 10 मिनिटं देऊ, असं रोहित पवार म्हणाले. यानंतर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत सदर माहिती दिली. त्यानंतर मध्यरात्री 1.24 मिनिटे वाजता विवेक भीमनवार यांनी सक्तीच्या रजेवर जात असल्याची एक्सवर पोस्ट केली. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य?
आंदोलकांचा राजीनाम्यासाठी आग्रह, पण सरकारनं चौकशी समिती नेमली
चौकशी होईपर्यंत अध्यक्ष भीमनवार सक्तीच्या रजेवर
भीमनवार यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीस दोन महिन्यांचा वेळ
दिलीप भोसले चौकशी समितीचे अध्यक्ष, तुकाराम मुंडेही समितीवर
एमपीएससीतील आजी-माजी अध्यक्षांपासून शिपायांपर्यंतच्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार
आंदोलकांवरील गुन्ह मागे घेण्याचं आश्वासन
तीन वर्षात 70 हजार रिक्त पदे भरु असं आश्वासन
2027 मध्ये होणाऱ्या गट क च्या पदांमध्ये वाढ करणार
मागण्या मान्य करत असलेल्या पत्रावर मुख्य सचिवांची सही 
तहसिलदार भरतीत 60-40 ऐवजी 50-50 चा रेश्यो
आयोगाची सदस्य संख्या 11 पर्यंत वाढवली जाणार
एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार
पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवण्याचेही मान्य

एमपीएससी परीक्षांमधील कथित पेपरफुटी प्रकरणांची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी आयोग स्थापन करण्यात येणार आहे. या आयोगाच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 2027 मधील गट-क परीक्षेतील पदसंख्या दुप्पट करण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे. गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम होते. अखेर मागण्यांवर निर्णय झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. आता चौकशी आयोगाच्या कामकाजाकडे आणि सरकारकडून घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीकडे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.