Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीच्या रुत्व कोठारीची राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड; १३ वर्षांनंतर मुलांमधून पहिल्यांदा निवड…..

सांगलीच्या रुत्व कोठारीची राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड; १३ वर्षांनंतर मुलांमधून पहिल्यांदा निवड…..

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

वाशिम क्रीडा संकुल येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत सांगलीच्या रुत्व प्रितेश कोठारी याची १४ वर्षांखालील (U-14) शालेय राष्ट्रीय स्तरावरील लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (DSO), वाशिम यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत रुत्वने कांस्यपदक (Bronze Medal) पटकावत हा बहुमान मिळवला.

रुत्वने यापूर्वी सांगली येथे झालेल्या विभागीय शालेयक्रिडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेत आपली जागा निश्चित केली होती. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट सर्व्हिस आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत त्याने महाराष्ट्राच्या संघात आपले स्थान पक्के केले. रुत्व आमराई ऑफिसर्स क्लब येथील श्रेया पाई टेनिस अकॅडमीमध्ये सराव करतो. त्याला राष्ट्रीय कोच रवींद्र कदम सर, सोनू तोडू आणि निलेश बाबर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

रुत्वच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पोदार इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सांगलीचे मुख्याध्यापक श्री. जी. बी. पाटील सर, उपमुख्याध्यापिका विद्या आवटे मॅडम, क्रीडा शिक्षक स्वप्निल मोरे आणि क्रीडा विभाग प्रमुख सुजित वाघमोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे रुत्वच्या या यशासाठी मोठी प्रेरणा व पाठबळ मिळाले.

रुत्वच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पोदार इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक आणि सांगलीतील क्रीडाप्रेमींकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.