Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'ज्ञानेश कुमार मस्ट गो'चा नारा ! शिवाजी पार्कवर अवतरली तरुणाई; राजीनामा न दिल्यास 'पुन्हा जंतरमंतर'चा अभिजीत दीपकेंचा इशारा

'ज्ञानेश कुमार मस्ट गो'चा नारा ! शिवाजी पार्कवर अवतरली तरुणाई; राजीनामा न दिल्यास 'पुन्हा जंतरमंतर'चा अभिजीत दीपकेंचा इशारा

मुंबई : खरा पंचनामा 

'देशातील १३ कोटी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. ही मतचोरी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे 'ज्ञानेश कुमार मस्ट गो'चा नारा देत केंद्र सरकारने ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतला नाही तर पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन केले जाईल', असा इशारा कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिला.

तसेच तीन दिवस काय, तीन महिनेही तुरुंगात टाकण्यात आले तरी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीमार्फत शुक्रवारी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी मैदानाच्या सहा नंबर प्रवेशद्वारावर एका ट्रकलाच या आंदोलनाचे व्यासपीठ बनविण्यात आले होते. यावेळी अभिजीत दीपके यांनी मतदार विशेष पडताळणी मोहिमेवरून (एसआरआय) केंद्र सरकारला लक्ष्य केले.

आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन करण्याची भूमिका दीपके यांनी घेतली होती. आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून तरुणाई शिवाजी पार्कवर जमली होती. शिवाजी पार्कच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून शिवाजी पार्क मैदानात जाण्यास बंदी केल्याने सीजीपीने मैदानाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या दिला. विशेष म्हणजे ज्येष्ठ सिने अभिनेते नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, शर्लिन चोपडा, गायक विशाल ददलानी, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही आंदोलनाला हजेरी लावली. तर ठाकरे गटाकडून स्थानिक आमदार महेश सावंत, नगरसेवक साईनाथ दुर्गे हे उपस्थित राहिले होते.

'महात्मा गांधी जयंती दिनी लोकशाही, मतदानाचा अधिकार आणि नागरिकांच्या हक्कांसाठी आंदोलन करताना तुरुंगात टाकण्यात आले तरी मागे हटणार नाही', असा निर्धार अभिजीत दीपके यांनी व्यक्त केला. गांधीजी हे देशाचा आत्मा असून जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत गांधी जिवंत आहेत, असे सांगत गोडसे येतील आणि जातील, पण हा देश गांधींच्या विचारांवर टिकून आहे', अशा शब्दांत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती हल्ला चढवला.

मतचोरीसाठी ज्ञानेश कुमार यांचा वापर केला जात आहे. यामागचे सूत्रधार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असल्याचा आरोप करत पंतप्रधान जर ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा घेणार नसतील तर मोदींच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करू. ज्ञानेशकुमार जाणार नसतील तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.